राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाने बँकेवर दरोडा टाकल्याचं उघड

January 29, 2016 1:17 PM0 commentsViews:

raigad_ncpरायगड – 29 जानेवारी : पेणमध्ये चक्क राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाने बँकेवर दरोडा टाकल्याचं उघडकीस आलंय. वासुदेव पाटील असं या भामट्याचं नाव आहे.

पंधरा दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरसई शाखेवर 25 लाखांचा दरोडा पडला होता. त्यातल्या 13 आरोपींपैकी 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या टोळीचा मास्टर माईंड वासुदेव पाटील हा पाबळ तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि त्याची पत्नी जिल्हा परिषद सदस्या आहेत. या टोळीच्या अटके नंतर अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close