परेश रावल यांनी रामाशी केली मोदींची तुलना

January 29, 2016 5:22 PM0 commentsViews:

asda

29 जानेवारी : अभिनेते आणि खासदार परेश रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याची तुलना रामाशी केली . रामाचं नाव ज्या दगडांवर कोरलं होतं, ते दगड पाण्यावर तरले होते. तसंच मोदींच्या नावामुळेच भाजपं लोकसभा निवडणूक जिंकू शकली, असंही ते म्हणाले. गुजरातमधल्या निरमा विद्यापीठात ते बोलत होते.

तसंच यावेळी बोलताना परेश रावल यांनी असहिष्णूतावरही भाष्य केलं. जी लोकं महागड्या गाड्यांमधून फिरतात आणि ज्यांच्या आजू-बाजूला 24 तास सुरक्षा रक्षक तैनात असतात ती लोकं असहिष्णूतेवर कसं बोलू शकतात असा सवाल रावल यांनी यावेळी उपस्थित केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close