ऑस्ट्रेलियाकडून आफ्रिकेचा धुव्वा

March 4, 2010 12:55 PM0 commentsViews: 2

4 फेब्रुवारीहॉकी वर्ल्डकपमध्ये आज पहिली मॅच रंगली ती बलाढ्य आस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा तब्बल 12 गोलने धुव्वा उडवला. यजमान भारताचा 5-2ने पराभव करणार्‍या ऑस्ट्रेलियाने या मॅचमध्ये ही तुफान कामगिरी करत शानदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळासमोर दक्षिण आफ्रिकेची टीम सपशेल हतबल झाली. मॅचच्या पहिल्याच हाफमध्ये ऑस्ट्रेलियाने 5-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती. तर दुसर्‍या हाफमध्ये आणखी सहा गोल मारत दक्षिण आफ्रिकेने हॉकी वर्ल्डकपमध्ये इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेला एकही गोल नोंदवता आला नाही. स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा हा सलग तिसरा पराभव ठरला

close