ऑस्ट्रेलियन ओपन : सानिया-मार्टिनाला महिला दुहेरीचे विजेतेपद

January 29, 2016 6:16 PM0 commentsViews:

ausopenlive

29 जानेवारी : भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार मार्टिना हिंगिस या जोडीने सातत्यपूर्ण कामगिरीचा नजराणा पेश करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपद शुक्रवारी पटकावले.

सानिया आणि मार्टिनाने चेक प्रजासत्ताकच्या अँड्रिया हॅलव्हाकोव्हा आणि लुसी हॅरडेका या जोडीचा 7-6, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चालू मोसमातील सानिया आणि मार्टिना जोडीचे हे पहिले ग्रँडस्लॅम आहे. सानिया-मार्टिना जोडीने जुलिया जॉर्जेस आणि कॅरलोलिना प्लिस्कोव्हा या जोडीचा 6-1, 6-0 असा पराभव करीत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सध्या ही जोडी भलतीच फॉर्मात असून त्यांनी खेळलेल्या 36 मॅचेसमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close