दत्ता पडसलगीकर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

January 29, 2016 9:13 PM0 commentsViews:

Datta-Padsalgikarमुंबई – 29 जानेवारी : पोलीस आयुक्तपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी दत्ता पडसलगीकर यांची वर्णी लागली आहे. सेवानिवृत्त होत असलेले विद्यमान पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून उद्या (शनिवारी) पडसलगीकर पदभार स्वीकारणार आहेत. प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून पडसलगीकर पोलीस दलात ओळख आहे.

मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. सौदी सरकारकडून जावेद यांच्या निवडीला मान्यता मिळाल्याने त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदी कोण, याबाबतची चर्चा जोर धरत होती. या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

पडसलगीकर सध्या दिल्लीत इंटेलिजन्स ब्युरोत कार्यरत आहेत. ते 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. जावेद अहमद सेवानिवृत्त होताच पडसलगीकर यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळे पोलीस आयुक्त म्हणून पडसलगीकर यांना ऑगस्ट 2018 पर्यंत काम करण्याची संधी मिळणार आहे.

 कोण आहेत दत्ता पडसलगीकर?

-1982च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी
– प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून ख्याती
– सध्या ते आयबीमध्ये अतिरिक्त संचालक आहेत
– अमेरिकेसह त्यांनी अनेक देशांमध्ये काम केलंय
– राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं नेटवर्किंग


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close