पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

March 4, 2010 1:15 PM0 commentsViews: 4

4 फेब्रुवारीपुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला.3 हजार 196 कोटींची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष निलेश निकम यांनी सभागृहात मांडला. रस्ते सुधारणा, वाहतूक यासाठी पालिकेने यंदा 482 कोटींची भरीव तरतूद केली आहे. जवाहरलाल नेहरू योजनेतून करण्यात येणार्‍या विकासकामांसाठी 581 कोटींची तरतूद असणार आहे. तर घनकचरा व्यवस्थापनासाठी 106 करोड आणि पाणीपुरवठा योजनांसाठी 414 कोटी रूपयांची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे.

close