दुबईत मराठीचा झेंडा

March 4, 2010 1:28 PM0 commentsViews: 1

4 फेब्रुवारीदुबईमध्ये आज दुसर्‍या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे.भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी सात वाजता हा सोहळा होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष आहेत, कविवर्य मंगेश पाडगावकर. निमंत्रित साहित्यिक आणि मराठी रसिकही या सोहळ्याला उपस्थित आहेत.मंगेश पाडगावकर यांची प्रकट मुलाखत, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद आणि दुबईची सफर असे भरगच्च कार्यक्रम 4 ते 6 मार्च या काळात होणार आहेत. दुबईत कडक कायदे पाळून आयोजकांनी चांगले नियोजन केले आहे. आज संमेलनात पाडगावकरांची मुलाखत रंगणार आहे.

close