उत्तर प्रदेशात मंदिरात चेंगराचेंगरी; 61 ठार, 400 जखमी

March 4, 2010 2:02 PM0 commentsViews: 3

4 फेब्रुवारीउत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील राम जानकी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 61 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 400 लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 35 मुलांचा समावेश आहे. कृपालू महाराजांच्या आश्रमातील भंडार्‍याच्या कार्यक्रमाच्या वेळी ही दुर्घटना घडली. गोरगरिबांना यावेळी भांडी वाटण्याचा कार्यक्रम सुरू होता. यासाठी गर्दी झाली असताना आश्रमातील राम-जानकी मंदिराची बांधकाम सुरू असलेली भव्य कमान कोसळली. या कमानीच्या ढिगार्‍याखाली तसेच त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू झाला. यातील अनेक जखमींना अलाहाबादला नेण्यात आले आहे. गर्दीचे व्यवस्थापन नसल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. तर या कार्यक्रमासाठी मंदिर प्रशासनाने कुठलीही मदत मागितली नव्हती, असे पोलिसांनी म्हटले आहे. प्रतापगढपासून 75 किलोमीटरवर हा कृपालू महाराजांचा आश्रम आहे. अजूनही या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री मायावती यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

close