नांदेड जिल्हा बँकेच्या संचालकांना नोटीसा

March 4, 2010 2:08 PM0 commentsViews: 37

4 फेब्रुवारीनांदेड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी बँकेच्या 44 संचालकांना सहकार विभागाने नोटीसा बजावल्या आहेत. त्यामध्ये माजी संचालक खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचाही समावेश आहे. तसेच बँकेच्या काही अधिकार्‍यांनाही नोटीसा बजावण्यात आली आहे. या बँकेतील घोटाळ्यानंतर नांदेड जिल्ह्यातील 142 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची पोलिसात नोंद आहे. या बँकेला संजीवनी मिळावी यासाठी 100 कोटींचे विशेष पॅकेजही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंजूर केले होते.पण बँक सुरु करण्यासाठी एवढा निधी अपुरा असल्याचे बँकेच्या प्रशासकांचे म्हणणे आहे.

close