युग चांडक अपहरण खून प्रकरणी दोन्ही आरोपी दोषी

January 30, 2016 1:56 PM0 commentsViews:

yuag_chandakनागपूर 30 जानेवारी : युग चांडक अपहरण प्रकरणी दोन्ही आरोपी खून आणि अपहरण प्रकरणी दोषी आढळले आहे. आज युग चांडक अपहरण आणि खून खटल्याची सुनावणी झाली. या प्रकरणाची 3 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

नागपूरचे प्रसिद्ध डेंटीस्ट डॉ मुकेश चांडक यांचा सेंटर पाँईट स्कूल पाईंट स्कूलमध्ये शिकणारा युगचे 1 सप्टेंबर 2014 रोजी अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यानी आधी 10 कोटीनंतर 5 कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती. अपहरणकर्त्यानी युगचा नागपूर जवळील पाटणसावंगी जवळील लोणखैरी येथील नाल्यात निर्घृण खून केला होता. या प्रकरणात डॉ.चांडक यांच्याकडील जुना कम्पाऊंडर राजेश दवारे आणि त्याला साथ देणारा अरविंद सिंग यांना अटक करण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close