ठाण्यात पाणीबाणी, शनिवारी-रविवारी पाणीपुरवठा बंद

January 30, 2016 2:27 PM0 commentsViews:

mumbai water3ठाणे – 30 जानेवारी: जिल्ह्यात प्रामुख्याने पाणीपुरवठा होणार्‍या बारवी आणि आंद्र या दोन्ही धरणात आता जेमतेम पुरेल इतकाच
जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याचं काटेकोरपणे नियोजन व्हावं यासाठी आता संपूर्ण जिल्ह्यातील पाणीपुरवठा शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

सध्या प्रत्येक शहरात निरनिराळ्या दिवशी पाणीकपात सुरू आहे. त्यात अधिक सुसूत्रता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, आठवडयातील दोन ऐवजी तीन दिवस पाणी बंदीचं संकट मात्र तूर्तास टळलं आहे.

येत्या सहा 6 फेब्रुवारीपासून पाणीकपातीचं नवं वेळापत्रक लागू होईल. या संदर्भात लघु पाटबंधारे खात्याने शुक्रवारी एका बैठकीचे आयोजन केलं होतं. परंतू तीन दिवस पाणीकपात करण्याऐवजी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पाणीकपात करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आलाय. याची अंमलबजावणी येत्या 6 फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पाणीकपातीत वाढ होणार नसल्यामुळे नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. बारवी धरणात 115 द.ल.घ.मी. तर टाटा आंद्र धरणात 110 द.ल.घ.मी. एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने हा पाणीसाठी 15 जुलैपर्यंत पुरण्याची शक्यता कमी आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close