मुंडण करून वसईत सरकारचा निषेध

March 4, 2010 2:12 PM0 commentsViews: 46

4 फेब्रुवारीवसई विरार महापालिकेतून 53 गावांना वगळण्यात यावे या मागणीसाठी आमदार विवेक पंडित यांच्यासह सुमारे 500 कार्यकर्त्यांनी आज मुंडन केले. यात 41 महिलांनीही आपले केस कापून सरकारचा निषेध नोंदवला. या मागणीसाटी आमदार विवेक पंडित यांनी मंगळवारपासून उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.दरम्यान पंडित यांना ब्लडप्रेशर आणि डायबेटिसचा त्रास वाढला आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.

close