देवनार कचरा डेपोवर आगीमुळे पसरले धुराचे साम्राज्य

January 30, 2016 2:46 PM0 commentsViews:

devonar_मुंबई – 30 जानेवारी : देवनार कचरा डेपोला भीषण आग लागलीये. गेल्या दोन दिवसांपासून आग पेटलेली आहे. आग विझवण्यासाठी 18 फायर अग्निशमन दलाचे इंजिन आणि 8 वॉटर टँकर घटनास्थळी आहे. आग विझवण्याचे आटोक्यात प्रयत्न सुरू आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

या आगीमुळे पुरवा उपनगरातील मानखुर्द,चेम्बूर,गोवंडी,घाटकोपर येथे हवेत सर्वत्र धुराचे लोट दिसत आहेत. प्रदुषण युक्त हवा निर्माण झाल्यामुळे गोवंडी शिवाजी नगर परिसरातील नागरिकांना श्वसन क्रिया करण्यास त्रास होत आहे. तर या आगीमुळे शिवाजीनगर कचरा डेपो परिसरात असलेल्या महापालिका शाळांना दोन दिवस सुट्टी दिली आहे. श्वसन क्रियेचा त्रास होत असल्याने काही नागरिक रुग्णालयात उपचारासाठी भरती आहेत. गेल्या दोन दिवसांत परिसरातील नागरिकांना श्वसन क्रियेचा त्रास तसंच उल्ट्या होत असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे स्थानिक खाजगी डॉक्टर सांगताय. या धुराचा आणि आगीचा बंदोबस्त महापालिकेने लवकर केला नाही तर जनतेच्या समस्येसाठी आंदोलनाचा इशारा स्थानिक नगरसेवक मोहम्मद सिराज शेख यानी दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close