पनवेलमध्ये नथुराम गोडसेला मानवंदना, बंदुकीचीही पुजा

January 30, 2016 3:27 PM0 commentsViews:

panvel_godse3पनवेल – 30 जानेवारी : आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे याने गोळ्या झाडून हत्या केली होती. ज्या बंदुकीने नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या त्या बंदुकीची पनवेलमध्ये पुजा करण्यात आली. एवढंच नाहीतर नथुराम गोडसेला मानवंदनाही देण्यात आली.

पनवेल मध्ये महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने नथुराम गोडसे यांच्या फोटोस आणि त्यांनी ज्या बंदुकीने गांधी यांची हत्या केली त्या बंदुकीच्या फोटोचे देखील पूजन करण्यात आले. महाराणा प्रताप बटालियन या हिंदू संघटनेद्वारे नथुराम गोडसे यांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नथुराम गोडसे देशासाठी शहीद झाले. त्यांनी आपले प्राणअर्पित केले. कारण, महात्मा गांधी यांच्यामुळे देशाची फाळणी झाली आणि त्यानंतर ज्या कत्तली घडल्या त्याला गांधी जबाबदार आहे. गांधी हे भारताचे राष्ट्रपिता नाहीच आणि आम्ही त्यांना मानत नाही असं महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांचं म्हणणंय. तसंच नथुराम गोडसेने ज्या शस्त्राने गांधींची हत्या केली. त्या शस्त्राची 2008 पासून आम्ही पूजा करतोय असंही सेंगर यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close