फिल्म रिव्ह्यु :’साला खडूस’

January 30, 2016 6:27 PM0 commentsViews:

अमोल परचुरे, समीक्षक

एक अपयशी कोच आणि त्याने दिलेला यशस्वी लढा…जगभरात आत्तापर्यंत अनेक सिनेमे बनले, आपल्याकडे ‘चक दे इंडिया’चं यशस्वी उदाहरण आहेच. आता त्याच ट्रॅकवरचा आणखी एक सिनेमा आलाय, ‘साला खडूस…’

काय आहे स्टोरी ?

sala khadoosसाला खडूसची सुरुवात एकदम जबरदस्त आहे. हा सिनेमा कदाचित काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करतोय असं वाटायला लागतं आणि तेवढयात सिनेमा नेहमीच्याच ट्रॅकवरुन जायला लागतो. बॉक्सिंगसाख्या खेळातसुद्धा कसं राजकारण शिरलंय हे दाखवतानाचे प्रसंग थोडे भडक झालेत. लैंगिक शोषणाचे आरेाप असलेल्या कोचची चेन्नईमध्ये रवानगी होते. तिथे त्याला माडी या मुलीमध्ये सॉलिड स्कोप आहे हे लक्षात येतं आणि मग जिंकण्याबरोबरच स्वत:ला सिद्ध करण्याची आदी तोमर याची धडपड सुरू होते. प्रॉब्लेम असा आहे की जिथे जिथे सिनेमा इमोशनल होतो, तिथे त्यातली गोष्ट पटत नाही, भिडत नाही.

नवीन काय ?saala_khadus3

हॉकीचा खेळ बघून झाला आता बॉक्सिंग… जिंकण्याच्या इर्षेबरोबर इथे खेळातलं राजकारणही आहेच. सुधा प्रसाद या दिग्दर्शिकेचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा, पण याआधी तिने सात वर्षं मणिरत्नम यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम केलंय. मित्र-माय फ्रेंड सारख्या सिनेमाचं स्क्रीप्ट तिने लिहिलंय. म्हणूनच प्रोमोमधून कथेचा अंदाज आला असला तरी सिनेमा वेगळ्या वळणाचा असेल असं वाटलं होतं. पण मी आधी म्हटलं तसं, हॉकीच्या ऐवजी बॉक्स्ंागि आहे. बाकी बराचसा तसाच मामला आहे. यातला नायकसुद्धा जिंकण्याच्या भावनेनं पेटलेला आहे, म्हणून तो खडूस आहे. जसा शाहरुख ‘चक दे इंडिया’मध्ये होता. एकंदरित, साला खडूस हा सहज अंदाज बांधता येईल असा म्हणजे अगदीच प्रेडीक्टेबल सिनेमा झालेला आहे.

 रेटिंग 100 पैकी 50 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close