वसतिगृहात विद्यार्थीनींना दिली जाते सडलेली फळं !

January 30, 2016 9:54 PM0 commentsViews:

hingoli34हिंगोली – 30 जानेवारी : शहरातील अकोला बायपास भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहातील मुलींना निकृष्ट जेवण देण्यात येत असून कच्च्या चपात्या, सडलेली फळं दिली जात आहेत. शिवाय कर्मचार्‍याकडून अतिशय हीन दर्जाची वागणूक देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विद्यार्थिनींनी वसतिगृहातच आंदोलन सुरू केलंय.

विद्यार्थिनीच्या आंदोलनाची दाखल घेत वसतिगृहाला आमदार तानाजी मुटकुळे आणि समाज कल्याण उपयुक्त छाया कुलाल यांनी भेट देऊन मुलींच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुलींनी वसतिगृहात मिळत असलेल्या वागणुकीचा व निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत तक्रार केली. काही कर्मचारी मुलींना अश्लील भाषेत आणि जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा आरोप मुलींनी केला. त्या ठिकाणी मुलींचे दोन गट निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. काही मुली सुविधा मिळत असून कर्मचारी चांगले असल्याचे सांगत होत्या तर जास्त संख्या असलेल्या गटातील मुली व्यथा मांडत होत्या. मुलींना देण्यात येत असलेले सडके सफरचंदही मुलींनी दाखविले.
मुलींना चांगल शिक्षण,चांगल आरोग्य येईल शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close