खादीत कोट्यवधींना रोजगार देण्याची ताकद – मोदी

January 31, 2016 1:04 PM0 commentsViews:

modi man ki baat

नवी दिल्ली – 31 जानेवारी :  सध्या युवकांमध्ये खादीबद्दलचे आकर्षण खूप वाढलं आहे. खादीत कोट्यवधी नागरिकांना रोजगार देण्याची ताकद असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) ‘मन की बात’ या कार्यक्रमातून सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नागरिकांशी नवीन वर्षातील पहिली मन की बात केली. या कार्यक्रमात त्यांनी देशवासियांना खादीचे कपडे वापरण्याचा सल्ला दिला. महात्मा गांधींना श्रद्धांजली म्हणून प्रत्येकाने खादीचा वापर करावा. प्रत्येकाकडे एक तरी खादीचा ड्रेस जरूर असावा, असंही ते म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते की भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता हे खादीत आहे. सध्या खादीच्या माध्यमातून 18 लाख रोजगार निर्मिती झालेली आहे. यामध्ये कोट्यवधींना रोजगार देण्याची क्षमता असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तसंच, 8190881908 या क्रमांकावर मिस कॉल देऊन मोबाईलवर कधीही मन की बात ऐकता येणार आहे. त्याची घोषणाही मोदींनी आजच्या कार्यक्रमात केली. सध्या ही सेवा फक्त हिंदी भाषेपुरतीच मर्यादित असणार आहे. पण लवकरच सर्वांना त्यांच्या मातृभाषांतही ही मन की बात एकता येणार आहे.

यावेळी त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ य़ोजनेचं यश अधोरेखित करतानाच हरियाणातील वाढत्या मुलींच्या जन्मदराबद्दल हरियाणा सरकारचे कौतूक केलं आहे. तसंच स्टार्टअप योजना यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close