दादर स्थानकावर धावती लोकल पकडताना प्रवाशाचा मृत्यू

January 31, 2016 2:47 PM0 commentsViews:

मुंबई – 31 जानेवारी : धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एका 45 वषच्य व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  दादर रेल्वे स्टेशनवर हा अपघात घडला. शफीउद्दीन अब्दुल गनी असं अपघतात मृत पावलेल्या प्रवाशाचे नाव आहे.

Mumbai locak23

शफीउद्दीन अब्दुल गनी हे आज सकाळी दादर रेल्वे स्टेशनवर आपल्या कुटुंबासोबत लोकल पकडत होते. पत्नी आणि मुलांना लोकमध्ये चढवल्यानंतर लोकलने वेग पकडला. त्यामुळे ते धावत लोकल पकडण्याचा प्रयत्न करू लागले. लोकलचा वेग आणखी वाढल्याने लोकलसह धावताना ते अचानक प्लॅटफॉर्मच्या पोकळीत पडले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर धावत्या एक्स्प्रेसमधून उतरताना एका महिलेचा पडून मृत्यू झाला होता. रेल्वे अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे प्रवाशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close