IBN लोकमतचा दणका: आशीर्वाद प्रार्थना केंद्राचा व्यवस्थापक पोलिसांच्या ताब्यात

January 31, 2016 5:53 PM4 commentsViews:

वसई – 31 जानेवारी :वसईच्या भोंदूबाबाप्रकरणी अखेर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या भोंदूबाबाचा पर्दाफाश केल्यानंतरही IBN लोकमतने सातत्याने या बातमीचा पाठपुरावा करत होता. आखेर आज रविवारी सबॅस्टिअन मार्टिन यांच्या वसईतील आशीर्वाद प्रार्थना केंद्राचे व्यवस्थापक कुर्वे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे.

Vasai bhondubaba1

वसईमध्ये गेल्या 8 वर्षांपासून सॅबिस्टन मार्टिन या भोंदूबाबाने भोळाभाबड्या रुग्णांना असाध्य आजार बरे करण्याचे दुकान थाटले आहे. किडनी, मधुमेह, गुडघ्याचे आजार हात लावताच बरे केले जातील असा विश्वास तो रुग्णांना देतोय. असे अनेक व्हिडीओज गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियामध्ये फिरतायत. पण या व्हिडीओजच्या बरोबरीने या मार्टिनविरोधात फसवणुकीच्या तक्रारीही दाखल होतायत, हे लक्षात आलं. अखेर या भोंदूबाबाचा आयबीएन लोकमतने पर्दाफाश करत सॅबिस्टन मार्टिनची भोंदूगिरी सर्वांसमोर आणली.

संमोहनाव्दारे तो लोकांची फसवणूक करत होता. असाध्य रोग बरे करण्याचा दावा करून त्यानं अनेकांना फसवल्याच्या घटनाही आम्ही उघड केल्या. त्या भोंदूकडून फसवले गेलेले लोक समोर आले आणि त्यांनी त्याची भोंदूगिरी उघड केलीय. गुरुवारपासून आम्ही या बातमीचा पाठपुरावा करत होता. आयबीएन लोकमतने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांनी यावर मौन सोडलंय. दोन महिन्यापासून तो भोंदू आश्रमात नसल्याचं शारदा राऊत यांनी सांगितलं. लोकांच्या तक्रारी आल्या असून त्यानुसार कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं होत. आज रविवारी या प्रकरणातली पहिली कारवाई झाली. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने तक्रार दाखल केली होती, त्या बळावर आशीर्वाद प्रार्थना केंद्राच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एवढचं नाही तर मुख्य सूत्रधार सबॅस्टिअन मार्टिनलाही लवकरच ताब्यात घेतलं जाईल असं आश्वासनही पेालिसांकडून दिलं जातं आहे.

आतापर्यंतचा घटनाक्रम :
28 जानेवारी – आयबीएन लोकमतवरुन आम्ही सुरू केला अंधश्रध्देविरोधात लढा. वसईच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्रातल्या शिबीरात नेमकं काय चालतं, त्याचे व्हीडीओज आम्ही जनतेसमोर आणि सरकारसमोर ठेवले, आणि या भोंदूबाबावर कारवाई का होत नाही हा प्रश्न लावून धरला.

29 जानेवारी – वसईतल्या या केंद्राजवळ राहणा-या रहिवाशांनी आयबीएन लोकमतचे आभार मानले आणि आपल्या व्यथा मांडल्या. याच केंद्रात उपचारासाठी गेलेल्या पण फसवणूक झालेल्या काही रुग्णांनीही आपले अनुभव सांगितले. 24 तास उलटून गेल्यावरही पोलिस गप्पच होते. नेत्यांकडूनही सावध प्रतिक्रिया येत होत्या. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने मात्र वसई पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. संध्याकाळनंतर हालचालींना सुरुवात झाली, मार्टिनविरोधात तीव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.

30 जानेवारी – भोंदूबाबा सबॅस्टिअन मार्टिनविरोधात आता मनसेनंही उडी घेतली. सरकारनेसुध्दा कारवाई करण्याचे संकेत दिले. पालघरच्या एसपी शारदा राऊत यांनीही मग कारवाईचं आश्वासन दिलं. सबॅस्टिअन मार्टिनला पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस पाठवली गेली, पण अनेक रुग्णांचे आजार बरे करणारा हा मार्टिन, वैद्यकीय कारण सांगून पोलिसांकडे हजर झालाच नाही.

31 जानेवारी – या प्रकरणातली पहिली कारवाई झाली रविवारी. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने तक्रार दाखल केली होती, त्या बळावर आशीर्वाद प्रार्थना केंद्राच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्य सूत्रधार सबॅस्टिअन मार्टिनलाही लवकरच ताब्यात घेतलं जाईल असं पेालिसांकडून सांगितलं जातंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 • kenan pereira

  Respected Sir,
  In the Bible Scriptures Declares in Luke 9:1-2 as Jesus gave each disciples power and authority over all demons and to cure diseases and he send them
  out to proclaim the kingdom of GOD and to Heal. And at Jesus Christ Instructions in Mark 16:15-18 “they will place their hands on sick people, and they will get well.”
  In Jesus Ministry of Work,THE LORD,Did Miracles and Casted out demons out of People and when the LORD Jesus Christ went to be with Father,He Told his
  Disciples priorly in John 14:12 that “Very Truly,I tell you,the one who believes in me will also do the works that I do and,in fact,will do Greater works than these,because I am going to the Father.
  My Testimony is that i have seen with my Eyes at Dr Martin’s Center,deliverance from diseases for my Daddy who was supernaturally Healed from Diabetic Wound and the Wound was Healed Completely in March 2012 as Dr Martin placed his Hands on my daddy’s Leg.Never that Foot was Affected again.
  i have seen Miracles at the Center for my Friends and Relatives who were also delivered from Cancer,alcohol,drugs Issue.
  Also Seeing Many Miracles Happening Today as i Hear and see and witnessed the Testimonies in Jesus Name.
  As the Scripture Declares in Matthew 19:26 —
  26Jesus looked at them and said, “With man this is impossible, but with God all things are possible.”
  And the scripture Declares in Mark 9:23 — “Everything is possible for him who believes.”.Hallelujah.Amen.
  Thank you Sir.

  • prarthana christain

   this is very true….

 • kenan pereira

  Respected Sir,
  In the Bible Scriptures Declares in Luke 9:1-2 as
  Jesus gave each disciples power and authority over all demons and to
  cure diseases and he send them
  out to proclaim the kingdom of GOD
  and to Heal. And at Jesus Christ Instructions in Mark 16:15-18 “they
  will place their hands on sick people, and they will get well.”

  In Jesus Ministry of Work,THE LORD,Did Miracles and Casted out demons
  out of People and when the LORD Jesus Christ went to be with Father,He
  Told his
  Disciples priorly in John 14:12 that “Very Truly,I tell
  you,the one who believes in me will also do the works that I do and,in
  fact,will do Greater works than these,because I am going to the Father.

  My Testimony is that i have seen with my Eyes at Dr Martin’s
  Center,deliverance from diseases for my Daddy who was supernaturally
  Healed from Diabetic Wound and the Wound was Healed Completely in March
  2012 as Dr Martin placed his Hands on my daddy’s Leg.Never that Foot was
  Affected again.
  i have seen Miracles at the Center for my Friends and Relatives who were also delivered from Cancer,alcohol,drugs Issue.
  Also Seeing Many Miracles Happening Today as i Hear and see and witnessed the Testimonies in Jesus Name.
  As the Scripture Declares in Matthew 19:26 —

  26Jesus
  looked at them and said, “With man this is impossible, but with God all
  things are possible.”
  And the scripture Declares in Mark 9:23 — “Everything is possible for him who believes.”.Hallelujah.Amen.
  Thank you Sir.

 • prarthana christain

  MERI IBN LOKMAT SE REQUEST HAI KI OH EK BAAR UN LOGONSE UNKE NAAM PUCHE, JINHONE YE NEWS INTERNET SE LEKAR DI HAI. YAA FIR IBN NE HI KHUD INTERNET SE YEH VEDIO LEKAR OBJECTION LIYA HAI? ….VAISEHI YEH JO VEDIO ME DIKH RAHA HAI , OH GARIB LOG THIK HO RAHE HAI, JO PAHALE SE HI GARIB BHI HAI AUR MARNE KE KAGAR PAR PAHUNCHE THE. JO LOG UNKE KHILAP BOL RAHE HAI OH AISE GARIB BIMAR KE PASS KHADE TAK NAHI RAHENGE. SAME CHANNEL PAR SHIRDI WALA VEDIO DEKHE KI SHIRDI ME EK GARIB BIMAR KO KOI HAT TAK NAHI LAGA RAHA HAI. USKO KACHARE KI GAADI SE LEKAR JAANA PADA.

close