टीम इंडियाने रचला इतिहास! भारताकडून ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

January 31, 2016 7:08 PM0 commentsViews:

team India

सिडनी –  31 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम टी-20 लढतीत भारताने तिसरी मॅचही आपल्या खिशात घातली आहे. टीम इंडियाने टी-20 या मालिकेत 3-0 असा ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली. टीम इंडियाने 7 विकेट्स राखून 200 रन्स करत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात धूळ चारली.

सिडनीच्या टी-20त ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 198 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. 198 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी प्रत्युरात धडाकेबाज सुरूवात केली. रोहितनं 38 बॉल्समध्ये 5 चौकार आणि1 षटकारासह 52 रन्सची खेळी केली तर विराटनं 36बॉल्समध्ये 2 चौकार आणि एका षटकारासह 50 रन्स काढले. मग अखेरच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 17 रन्सची गरज असताना युवराज आणि रैनानं 19 रन्स भारताला विजय मिळवून दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close