मंदिरातील चेंगराचेंगरीत; 63 ठार, 64 जखमी

March 4, 2010 4:29 PM0 commentsViews: 4

4 फेब्रुवारीउत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील राम जानकी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 63 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 64 लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 37 मुले आणि 26 महिलांचा समावेश आहे. मनगढ गावात कृपालू महाराजांच्या आश्रमातील कार्यक्रमाच्या वेळी ही दुर्घटना घडली. कृपालू महाराजांच्या पत्नीच्या पुण्यतिथीनिमित्त आश्रमात गोरगरिबांना अन्न आणि संसारोपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी आश्रमातील राम-जानकी मंदिराची बांधकाम सुरू असलेली भव्य कमान कोसळली.या कमानीच्या ढिगार्‍याखाली तसेच त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू झाला. यातील अनेक जखमींना अलाहाबादच्या सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 39 जणांना उपचारानंतर डिसचार्ज देण्यात आला. गर्दीचे व्यवस्थापन नसल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. तर या कार्यक्रमासाठी मंदिर प्रशासनाने कुठलीही मदत मागितली नव्हती, असे पोलिसांनी म्हटले आहे. प्रतापगढपासून 80 किलोमीटरवर हा कृपालू महाराजांचा आश्रम आहे.दरम्यान मुख्यमंत्री मायावती यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

close