पत्नीसह पोटच्या दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या

February 1, 2016 11:41 AM0 commentsViews:

crime scene

कल्याण – 01 फेब्रुवारी : पत्नीसह पोटच्या 2 मुलींची गळा चिरून हत्या करून पतीने स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कल्याणच्या म्हारळ गावात उघडकीस आली. या घटनेने कल्याण परिसर हादरून गेला आहे.

रणजित यशवंतराव (45), असं आत्महत्या केलेल्या व्यक्ती नाव असून, त्याने पत्नी स्वाती (38) सह, मुलगी श्रद्धा (14) आणि श्रेया (7) यांची हत्या केली आहे. रणजित कुटुंबियांसह म्हारळा गावातील मोहन टॉवर इमारतीत राहत होता. पाच दिवसांपूर्वी शेजारी आणि नातेवाईकांसह शेगावला जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांचा मोबाईलही 5 दिवसांपासून बंद होता. इमारतीतील शेजार्‍यांना त्यांच्या रूममधून कुजल्याची दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे खिडकी तोडून शेजार्‍यांनी घरात प्रवेश केला असता चौघांचे मृतदेह आढळून आले. रणजित हा गळाफास घेतलेल्या अवस्थेत होता, तर त्याची पत्नी आणि दोन मुली रक्ताच्या थोराळयात पडल्या होत्या.

दरम्यान, कर्जबाजारीपणामुळे रणजित काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. त्यातूनच त्याने हे टोकचे पाऊल उचलेले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close