आखातात फडकली मराठी पताका

March 4, 2010 4:44 PM0 commentsViews: 3

4 फेब्रुवारीअखेर आखातात मराठी पताका फडकली आहे. दुबईत दुसर्‍या विश्व साहित्य संमेलनाचे उत्साही वातावरणात शानदार उद् घाटन झाले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष आहेत, कविवर्य मंगेश पाडगावकर. निमंत्रित साहित्यिक आणि मराठी रसिकही या सोहळ्याला उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अरुण दाते, शंकर अभ्यंकर, सिंधुताई सपकाळ, दुबईतल्या महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा संजीवनी पाटील, मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव, संमेलनाचे स्वागताध्यक्ष धनंजय दातार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचबरोबर परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि मनसेचे नेते शिरीष-पारकर यांनीही संमेलनाला हजेरी लावली आहे. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

close