मराठमोळ्या लावणीचा विश्वविक्रम

February 1, 2016 1:20 PM0 commentsViews:

चापून चोपून नेसलेलं भरजरी नव्वारी लुगडं, केसांपासून पायाच्या नखापर्यंत केला साज शृंगार आणि मोहक अदा दाखवणार्‍या 573 लावणी नृत्यांगणा.. हे चित्र पाहायला मिळाला कोल्हापूरात. निमित्त होतं एका विश्वविक्रमाचं. कोल्हापूरात झालेल्या ‘लावणीमानवंदना’ या कार्यक्रमाद्वारे लावणीनं नवा विश्वविक्रम केला आहे. या कार्यक्रमात एकाचवेळी तब्बल 573 नृत्यांगनांनी ढेलकीच्या तालावर लावणी सादर केली. यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून लावणी कलाकार इथं आल्या होत्या. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी झाली आहे. कथ्थक आणि लावणी नृत्यांगणा संयोगिता पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. विश्वविक्रमानंतर सहभागी नृत्यांगणा आणि लावणीप्रेमींनी एकच जल्लोष केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close