वसईत तणाव, आंदोलकांवर लाठीमार

March 5, 2010 9:36 AM0 commentsViews: 3

5 फेब्रुवारीवसई विरार महापालिकेतून 53 गावांना वगळण्यात यावे या मागणीसाठीच्या आंदोलनाची तीव्रता वाढल्याने वसईत तणाव निर्माण झाला आहे. आंदोलन करणार्‍या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. संघटनेच्या कार्यकर्त्या विद्युल्लता पंडित यात जखमी झाल्या. तसेच या मागणीसाठी उपोषण करणारे आमदार विवेक पंडित यांना पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दरम्यान आंदोलकांनी वाघोली नाक्यावर दोन एसटी बसची तोडफोड आणि जाळपोळ केली.वसई विरार महापालिकेतून 53 गावांना वगळण्यात यावे या मागणीसाठी आमदार विवेक पंडित यांनी मंगळवारपासून उपोषण सुरू केले आहे. विवेक पंडित यांना लो-ब्लड प्रेशर आणि आणि डायबेटीसचा होत आहे. त्यांना पोलिसांनी ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान विवेक पंडित यांनी उपचार घ्यायला नकार दिला आहे. तर हे आंदोलन अधिक चिघळू नये यासाठी दंगल नियंत्रण पथक तिकडे रवाना झाले आहे.

close