छगन भुजबळांच्या नऊ मालमत्तांवर ‘ईडी’चे छापे

February 1, 2016 2:07 PM0 commentsViews:

Chagan-Bhujbal

01 फेब्रुवारी :  दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या 9 मालमत्तांवर आज अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. यात भुजबळ कुटुंबियांची काही घरं आणि कार्यालयांचा समावेश आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहार आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी गेल्या 6-8महिन्यात छगन भुजबळ यांचा पाय खोलात गेलाय. गेल्या वर्षी जून महिन्यात एसीबीच्या विशेष पथकानं भुजबळ आणि कुटुंबीयांच्या 19 मालमत्तांवर छापे टाकले होते. त्यातून उघड झालेलं धनबळ पाहून सगळ्यांचेच डोळे फिरले होते. त्यानंतर, डिसेंबर महिन्यात ईडीनं भुजबळांभोवतीचा फास आवळत, वांद्रे आणि सांताक्रूझमधील त्यांच्या दोन मालमत्तांवर टाच आणली होती. त्याची किंमत तब्बल 110 कोटी रुपये होती. त्यानंतर, आज पुन्हा ‘ईडी’नं त्यांना झटका दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close