वादग्रस्त सावकार दिलीप सानंदा अटकेत

February 1, 2016 4:53 PM0 commentsViews:

बुलडाणा – 01 फेब्रुवारी : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांना खामगाव पोलिसांनी अटक केली आहे. खामगाव नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केली तेव्हा सानंदा त्यांच्या घरामध्ये लपून बसले होते, अशी माहिती मिळतेय.

delip_sanandaबुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचं प्रकरण खूप गाजलं होतं. या बांधकामाच्या वेळी आर्किटेक्टची नियुक्ती आणि निविदा काढताना ज्यादा भाव दिल्याचा आणि त्यातून शासनाचा नुकसान केल्याचा आरोप सानंदा यांच्यावर करण्यात आला होता. नगरसेवक संदीप वर्मा यांनी त्यासंबंधी खामगाव न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर खामगाव न्यायालयाने पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सानंदा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, तो नामंजूर झाला. त्यानंतर त्याला हायकोर्टात स्टे मिळाला. त्यानंतर 21 डिसेंबरला हायकोर्टाने सानंदा यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. तेव्हापासून पोलीस त्यांच्या शोधात होते.

सावकारी प्रकरणात सुद्धा सानंदा यांच्यावर बरेच आरोप आहेत, शहरात त्यांची चांगलीच दहशत आहे. बरेच अवैध धंदे यांचे शहरात सुरू आहेत. कुणीही त्यांच्या विरोधात बोलायला पुढे येत नाही. एकंदरीत आता त्यांच्या अटकेनंतर ही दहशत कमी झाली आहे अस स्थानिकांनी बोलून दाखवलं आहे.

वादग्रस्त सावकार

- दिलीप सानंदा यांच्या कुटुंबीयांची बुलडाणा आणि खामगाव भागात सावकारी
- कर्ज दिलेल्या शेतकर्‍यांकडून दामदुप्पट पैसै वसूल करत असल्याचा आरोप
- शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावल्या प्रकरणी गुन्हे दाखल
- 2009 – सानंदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केल्याबद्दल हायकोर्टाची राज्य सरकारला फटकार
- 2009 – सावकारी प्रकरणात सानंदा यांच्यावर कारवाई न केल्याबद्दल हायकोर्टाचा राज्य सरकारला 10 लाखांचा दंड
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close