वेगळ्या विदर्भाला विरोध करण्यासाठी शिवसेना सज्ज

March 5, 2010 9:44 AM0 commentsViews: 4

5 फेब्रुवारीवेगळ्या विदर्भाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. आता या प्रश्नावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शिवसेनेच्या आमदार, खासदारांची आज बैठक होत आहे. भाजपने विदर्भाच्या आंदोलनाला सध्या वेग दिला आहे. मित्रपक्ष असलेल्या भाजपचे विदर्भाच्या मुद्यावर शिवसेनेशी तीव्र मतभेद आहेत. पण राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात महाराष्ट्र तुटू देणार नाही, अशी घोषणा सेनेने केली आहे. भाजपची युवा जागर यात्रा दरम्यान वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपच्या युवा जागर यात्रेला काल शेगावमधून सुरूवात झाली आहे. आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघाली आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यावेळी उपस्थित होते. शिवसेनेने वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी यावेळी केले.

close