समीर भुजबळांचीही ईडीने केली चौकशी

February 1, 2016 6:54 PM0 commentsViews:

sameer-bhujbal-444नाशिक – 01 फेब्रुवारी : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांभोवती कारवाईचा फास आवळला जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कुटुंबियांवरही अंमलबजावणी संचलनालय म्हणजे ईडी नजर ठेवून आहे. भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांचीही ईडीकडून चौकशी केली.

अंमलबजावणी संचलनालयाने आज छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांशी संबंधित राज्यभरात नऊ ठिकाणी छापे टाकले आहेत. भुजबळ कुटुंबियांची काही घरं आणि कार्यालयांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई होत असल्याची माहिती आहे.

छगन भुजबळ यांनी तब्बल 62 बँकखात्यातून संशयास्पद व्यवहार केल्यामुळेच ही कारवाई होतेय असं भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी भुजबळ यांची अटक आता अटळ असल्याचंही किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे.

गेल्यावर्षी जून महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळांच्या घरांवर आणि कार्यालयांवर एकूण सोळा ठिकाणी छापे
टाकले होते. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयानेही कारवाई केली होती आणि आता ईडीने धाडसत्र सुरू केलंय. छगन भुजबळ सध्या अमेरिकेत आहेत. पण भुजबळ कुटुंबीयांच्या व्यवहारांवर ईडीची आता नजर असणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close