महागाई विरोधात आंदोलन

March 5, 2010 9:52 AM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारीमहागाई आणि कंत्राटी कामगार पध्दतीच्या विरोधात आज कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने औरंगाबाद मधील क्रांती चौकात जेलभरो आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी 200 पेक्षा जास्त कामगारांना अटक केली. सिटु , आयटक , इंटक , हिंदु मजदुर संघटना , बी. एम. एस. या कामगार संघटनांनी हे आंदोलन केले. महागाई, बेरोजगारी, असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस प्रवीण वाघ, सुभाष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

close