मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोल नाक्याची आता 420 कोटी बाकी, यावर्षी बंद होईल का ?

February 1, 2016 10:03 PM0 commentsViews:

MNS workers vandalise toll booths (54)पुणे – 01 फेब्रुवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे चा टोल यावर्षी बंद होणार का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विचारत आहे. कारण, आता मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर टोल नाक्याच्या 2019 पर्यंत जो करार झालाय त्यात आता टोलचे 420 कोटीच रुपये बाकी आहेत. आणि त्यामुळे 2016 हे वर्ष संपल्यानंतर हा टोल बंद करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केलीय.

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांच्या मागणीनंतर राज्यातील सर्व टोल नाक्यांवर किती टोल जमा होतो याची संपूर्ण माहिती एमएसआरडीसीच्या वेबसाईटवर टाकणं बंधनकारक केल्यानंतर आता मुंबई पुणे एक्स्प्रेसवे वर 2015 साली 433 कोटी रुपयांचा टोल जमा झाल्याचं दाखवलाय. 2005 सालापासून आत्तापर्यंत 2459 कोटी रुपये टोल पोटी जमा झाले आहेत आणि आता 2019 पर्यंत असलेल्या करारानुसार 420 कोटी रुपयेच बाकी असल्यानं 2016 साली एक्स्प्रेसवे वरील टोल बंद करावा अशी मागणी वेलणकर यांनी केलीय. खरं तर आयआरबीही टोल कंत्राटदार कंपनी 45 टक्के वाहन संख्या कमी दाखवल्याचं उघड होऊनही कोल्हापूर टोल बंद करणारं सरकार मुंबई पुणे एक्स्प्रेसवे टोल आणि मुंबई एन्ट्री पॉईंटच्या 5 टोल नाके अजून अभ्यास सुरु आहे या नावाखाली झोपा काढतंय असा आरोपही वेलणकर यांनी केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close