मुरूड समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

February 2, 2016 10:07 AM0 commentsViews:

रायगड – 01 फेब्रुवारी : मुरूडच्या समुदात बुडालेल्या 14व्या विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यात तटरक्षक दल आणि नौदलाच्या पथकाला यश आलं आहे. आज सकाळी 9च्या सुमारास मुरूड किनार्‍यालगत हा मृतदेह सापडला. दरम्यान, सोमवारी या ठिकाणी बुडून मरण पावलेल्या सर्वच्या सर्व 14 विद्यार्थ्यांचे मृतदेह आज सकाळी पुण्यात आणण्यात येणार आहेत.

Murud jangira

काल (सोमवारी) सकाळी पुणे येथील अबिदा इनामदार कॉलेजच्या विद्यार्थ्याची सहल मुरूडला आली होती. तीन बसमधून जवळपास 126 विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मुरूडला पोहोचले होते. मुरूडला पोहोचल्यानंतर यातील काही जण जेवणासाठी हॉटेलमध्ये थांबले तर काही विद्यार्थी तौसाळकर वाडीच्या मागे असलेल्या समुद्रात पोहण्यासाठी उतरले.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्राला भरती असतांना पोहण्यास मनाई करूनही 25 जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. भरतीच्या लाटांमुळे किनार्‍यावरची वाळू समुद्रात सरकली आणि या वाळूसोबतच विद्यार्थी समुद्रात ओढले गेले. भरतीच्या पाण्यामुळे त्यांना बुडताना कोणीही मदत करू शकले नाही. मच्छीमारांनी तातडीने बोटी समुद्राच नेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोवर 10 मुलींसह 4 मुलांचा मृत्यू झाला. तर 6 विद्यार्थिनींना वाचवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close