समीर भुजबळ यांना झालेली अटक ही सुडबुद्धीने – छगन भुजबळ

February 2, 2016 11:07 AM0 commentsViews:

Bhujbal2311

 वॉशिग्टन – 02 फेब्रुवारी : महाराष्ट्र सदन घोटाळयाप्रकरणी समीर भुजबळ यांना झालेली अटक ही सुडबुद्धीने केली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात छगन भुजबळ यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भुजबळ सध्या अमेरिकेतील वॉशिग्टनला आहेत.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात काल ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनयानं भुजबळ यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. त्यानंतर रात्री उशिरा छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अटक केली गेली. त्यानंतर भुजबळांची ही आलेली पहिली प्रतिक्रिया आहे.

या प्रकरणाशी समीर, पंकज किंवा माझा काहीही संबंध नाही. आम्ही कोणताही घोटाळा केलेला नाही. मात्र, काहीही करुन कारवाई करायची हा हेतू दिसून येतो आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी आमच्या काही जवळच्या लोकांचीही जबानी घेतली आहे. त्यात कुणी आमच्या बाजूनं अथवा विरोधात बोललंही असेल पण, अधिकार्‍यांना स्वत:ला जे हवं तेच लिहून त्यांनी आमच्या जवळील लोकांकडून सह्याही घेतल्या, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

ज्या महाराष्ट्र सदनावरुन हे प्रकरण सुरु आहे त्यामध्ये कोणताही घोटाळा झाला नाही. तसेच महाराष्ट्र सदनासाठी आमच्या सरकारने कोणतेही पैसे किंवा जमिन दिली नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करुन महाराष्ट्र सदनाचे सुंदर बांधकाम करण्यात आले. मात्र, किरीट सोमय्या यांनी आमच्या विरोधात अनेक खटले दाखल केले, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close