प्रियांका चोप्राला मिळणार ‘ऑस्कर’ प्रदान करण्याचा मान

February 2, 2016 12:24 PM0 commentsViews:

Priyanka in oscar

02 फेब्रुवारी : यंदा बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राला चक्क ‘ऑस्कर’ प्रदान करण्याचा मान मिळणार आहे. ऑस्करच्या ट्विटर अकाऊण्टवर आज 13 प्रेझेंटर्सची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रियंका चोप्राचा समावेश आहे. त्यामुळे यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी खास असणार आहे.

ऑस्कर हा हॉलिवूडमधील प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा मानला जातो. जगभरातील चित्रपट रसिक, समीक्षकांचे ऑस्कर पुरस्कार सोहळयाकडे लक्ष असतं. अमेरिकन टीव्ही शो क्वॉन्टिको मधल्या भूमिकेमुळे प्रियंका चोप्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. या भूमिकेसाठी तिला पीपल्स चॉईस अवॉर्डही मिळाला. सध्या याच शोच्या दुसर्‍या सीझनच्या चित्रीकरणात ती व्यस्त आहे. 28 फेब्रुवारीला कॅलिफोर्नीयातील डॉल्बी थिएटरमध्ये 88वा ऑस्कर पुरस्कार सोहळा रंगणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close