मराठमोळी कब्बडी खेळाच्या नव्या पर्वाला सुरूवात

January 31, 2016 8:54 PM0 commentsViews:

 

शंकर कांबळे, मुंबई

31 जानेवारीक्रिकेटला मागे टाकेल असा थरार आणि एखाद्या सिनेमाला मागे टाकेल अशी भन्नाट लोकप्रियता मिळवणारा पण अस्सल मराठी मातीतला खेळ कब्बडी. हा खेळ आत्ता चक्क ग्लोबल झालाय . प्रो कब्बडीचा तिसरा मोसम काल पासून सुरू झालाय त्याचा हा एक स्पेशल रिपोर्ट.

013

कबड्डी लाल मातीतला मराठमोळा खेळ. याच खेळाला कबड्डी कबड्डी म्हणत प्रो कबड्डी लीगने लाल मातीतून,थेट मॅटद्वारा संपुर्ण देशात पोहोचवले. पहिल्या दोन मोसमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता आता हे सामने वर्षातून दोनदा खेळवले जाणार आहेत. प्रो कबड्डी लीगच्या तिसर्‍या मोसमाला काल पासुन विशाखापट्टणम मधील राजीव गांधी स्टेडियमवर सुरुवात झाली.

या मोसमात एकूण 8 टिम्स् आपल्या भन्नाट खेळान लोकांचे मनोरंजन करणार आहेत!
प्रो कबड्डी लीग टिम्स्
1) बंगळूर बुल्स
2) दबंग दिल्ली
3) तेलुगू टायटन्स
4) जयपूर पिंक पॅन्थर्स
5 ) वॉरिअर्स बंगाल
6 ) यू मुम्बा
7) पटणा पायरेट
8) पुणेरी पलटण

तिसर्‍या मोसमाच्या पहिल्याच लढतीत कबड्डी रसिकांना अस्सल थरार पहायला मिळाला. गतविजेत्या यू मुम्बा ने तेलुगू टायटन्स चा 27/25 असा पराभव करुन आपल्या विजयाची घौडदौड कायम ठेवली तर दुसर्‍या सामन्यात बंगळुरू बुल्सने दबंग दिल्ली चा 35/29 ने धुव्वा उडवला. आज जयपूर पिंक पॅन्थर्स चे यू मुम्बा समोर आव्हान असणार आहे तर दुसर्‍या सामन्यात तेलुगू टायटन्स आणि पुणेरी पलटण एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे पुढील 5 आठवडे कबड्डी रसिकांचे मनोरंजन होणार यात काही शंका नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close