गर्भलिंग निदान चाचणीवरील बंदी उठवावी – मनेका गांधी

February 2, 2016 1:26 PM0 commentsViews:

3381428102 फेब्रुवारी :  देशातील स्त्रीभ्रूणहत्या थांबवण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी अजब सल्ला सुचवला आहे. गर्भवती महिलेची गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर घातलेली बंदी सरकारने उठवावी, अशी मागणी केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी केली आहे.

गर्भवती महिलेची गर्भलिंग निदान चाचणी करून गर्भाबाबतची माहिती पती-पत्नीला द्यावी. त्यामुळे गर्भाची योग्य काळजी घेणं सोईस्कर होईल. तसंच गर्भलिंग निदान चाचणी अनिवार्य करायला हवी. त्यामुळे स्त्रीगर्भांचं प्रमाण कळेल आणि त्यानंतरच्या जन्मदरावरून किती स्त्रीभ्रूणहत्या झाल्या ते समजेल असं मनेका गांधी यांनी म्हटलंय. मात्र याबाबत आपण आपले मत नोंदवले आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसून, यावर चर्चा सुरू असल्याचे गांधी यांनी या वेळी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close