भुजबळ कुटुंबियांना जाणूबुजून टार्गेट केलं जातंय -शरद पवार

February 2, 2016 2:36 PM0 commentsViews:

Sharad Pawar on tobacco

मुंबई – 02 फेब्रुवारी : एकाच आरोपाखाली एका कुटुंबाची तीन वेळा चौकशी कशी काय केली जाते, असा सवाल उपस्थित करत सरकारकडून भुजबळ कुटुंबियांना जाणूनबुजून टार्गेट केलं जात असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात ईडीकडून समीर भुजबळ यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळ कुटुंबियांची पाठराखण केली. भुजबळ यांनी मंत्रिपदावर असताना जे जे निर्णय घेतले ते त्यांचे एकटय़ाचे नव्हते, तर ते संपूर्ण मंत्रिमंडळाचे होते. भुजबळ कुटुंबियांविरोधात तक्रार देणारे एकाच पक्षातील आहेत. भुजबळांची चौकशी करणार्‍यांवर सत्ताधार्‍यांनी दबाव टाकला जात असल्याचा आरोप शरद पवारांनी किरीट सोमैयांचं नाव न घेता केला आहे.

भुजबळांविरोधात ईडीकडून सुरू असलेली कारवाई म्हणजे सत्तेचा गैरवापर करून राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न आहे. मात्र, आमची भूमिका स्वच्छ असल्याने आम्हाला काळजी करण्याचे कारण नसल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close