राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा, बसेसची तोडफोड आणि रास्ता रोको

February 2, 2016 5:48 PM0 commentsViews:

sameer_bhujbal343नाशिक – 02 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अटक झाल्यामुळे त्याचे पडसाद उमटले.
नाशिक,बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून समीर भुजबळ यांच्या अटकेचा निषेध केला. काही ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी एसटी बसेसची तोडफोड केली. तसंच कुठे रास्ता रोको तर कुठे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं.

समीर भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद येवल्यात ही उमटले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनमाड-शिर्डी मार्गावर रास्ता रोको करून राज्य सरकार आणि किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचं दहन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी सुमारे 35 कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर कलम 135 आणि 341 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनामुळे या मार्गावर वाहनांची रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. फडणवीस सरकार भुजबळ कुटुंबीयांवर राजकीय सूडबुद्धीने वागून त्यांना त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला. नाशिक आणि येवल्यामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

नाशिकमध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको

या रास्तारोकोनंतर नाशिकमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरूच आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठीक ठिकाणी रास्ता रोको करून समीर भुजबळ यांच्या अटकेचा निषेध करत आहे. नाशिकच्या द्वारका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून समीर भुजबळ यांच्या अटकेचा निषेध केला, किरीट सोमया यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला.,या वेळी पोलिसांनी आंदोलन करणार्‍या शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. नाशिकच्या मुंबई नाका,त्र्यंबकरोड,पिंपळगाव,लेखा नगर आदी भागात रस्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी ठिकठिकाणाहून शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

बीडमध्ये बसवर दगडफेक

तर बीडमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यात रास्ता रोको केला. या रास्ता रोकोत बसवर दगडफेक करण्यात आली. या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. बसवर दगडफेक केल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close