समलिंगींना आशेचा किरण, कलम 377 वर होणार सुनावणी

February 2, 2016 7:19 PM0 commentsViews:

lgbt_delhiनवी दिल्ली – 2 फेब्रुवारी : समलिंगी संबंध कायद्याने गुन्हा आहे असं घोषित करणारे कलम 377 प्रकरणाला आता नवीन वळण मिळालाय. समलिंगी पुरुषांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय. कलम 377 रद्द करण्याचं प्रकरण आता 5 न्यायमूतीर्ंच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आलंय. आता सरन्यायाधीश या 5 न्यायमूतीर्ंच्या खंडपीठाची नेमणूक करतील.

भारतीय दंड विधानातलं कलम 377 समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवतं. याच कलम 377 रद्द करायला आधी सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता. आज या दुरुस्ती याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने एकाप्रकारे समलिंगी पुरुषांना आशेचा किरण दाखवलाय. कोर्टाने पाच न्यायमूतीर्ंच्या खंडपीठाकडे हे प्रकरण पाठवले आहे. परंतु, यासाठी कोणत्या 5 न्यायमूर्तींची समिती असणार आहे आणि यावर कधी सुनावणी होणार आहे. हे मात्र, स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे एलजीबीटी समुहाने कोर्टाबाहेर एकच जल्लोष केला. हा आपला पहिला विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close