गुरुजी रजेवर गेले, विद्यार्थीच गुरुजी झाले !

February 2, 2016 9:18 PM0 commentsViews:

school_newsउस्मानाबाद -02 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचं 35 वं राज्यस्तरीय अधिवेशन नवी मुंबईत ऐरोली इथं 5 आणि 6 फेब्रुवारीला आहे. अधिवेशनाला अजून 3-4 दिवसांचा वेळ आहे. तरीदेखील उस्मानाबादचे शिक्षक 7 दिवसांच्या रजेवर गेले आहेत. आणि तेही शाळा विद्यार्थ्यांच्या जीवावर टाकून…त्यामुळे विद्यार्थीच शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचं समोर आलंय.

जिल्ह्यातून 3 हजार शिक्षक अधिवेशनासाठी नवी मुंबईत येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडणार याची त्यांना पर्वा नसल्याचं दिसतंय. जिल्ह्यात काही शाळेत एकूण 8 शिक्षक आहेत. त्यातले 7 शिक्षक हे अधिवेशनासाठी जातायत. तीन वर्षांतून एकदा असलेल्या या अधिवेशनासाठी शिक्षकांना विशेष रजा दिली जाते म्हणून शिक्षक शाळा सोडून 7 दिवस रजा टाकून गेले आहेत. काही शाळांमध्येतर विद्यार्थीच वर्गांमध्ये शिकवत आहेत असं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान, शिक्षक अधिवेशनाला गेल्यामुळे वर्गात गटप्रमुख म्हणून काही विद्यार्थी नेमणूक केली आहे. तेच विद्यार्थी आता शिकवत आहेत. शिक्षकांना वर्षभर इतर सुट्या असतात. तेव्हा शिक्षकांनी सुट्‌ट्या घेवू नयेत त्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होते या वर शासनाने कारवाई करावी अशी मागणी पालक करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close