राज्यसभेत गाजला महाराष्ट्रातील ‘पेड न्यूज’चा मुद्दा

March 5, 2010 10:22 AM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारीराज्यात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काही वृत्तपत्रांनी 'पेड न्यूज' दिल्याचा मुद्दा आज राज्यसभेत चर्चेला आला. पैसे घेऊन बातम्या देणार्‍या वृत्तपत्रांवर आणि पैसे देणार्‍या नेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अरूण जेटली यांनी केली. पेड न्यूजमुळे लोकांची फसवणूक होते, लोकशाही धोक्यात येते आणि निवडणूक प्रक्रिया अपयशी ठरते, असे जेटली म्हणाले. या प्रकरणात सरकारने ताबडतोब लक्ष घालावे, अशी मागणी माकपचे सिताराम येचुरी यांनी केली. यावर उत्तर देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी म्हणाल्या, की 'पेड न्यूज' प्रकरण गंभीर आहे. यावर प्रेस कौन्सिल आणि निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करतील.

close