मागासवर्गीय नेता आहे म्हणून माझा बळी दिला जातोय -भुजबळ

February 2, 2016 10:52 PM1 commentViews:

02 फेब्रुवारी : मी झुंझार नेता आहे. मागासवर्गीयांसाठी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून देशभरात काम करतोय. त्यामुळं माझे शत्रू मला संपवण्यास पुढे सरसावले आहे. माझा नाहक बळी दिला जात आहे असा राजकीय बचाव राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलाय.

महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने छगन भुजबळ यांच्याभोवती फास आवळण्यास सुरुवात केलीये. भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांना चौकशीनंतर अटक करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडालीय. समीर भुजबळ आता 8 दिवस ईडीच्या कोठडीत असणार आहे. या कारवाईमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्ष भुजबळांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं. पण, आता खुद्द भुजबळ अमेरिकेतून आपला बचाव करण्यास मैदानात उतरले आहे.

bhujbal_nashik_mumbai_acbमाझ्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. माझा मुलगा पंकजला ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्या मी मुंबईत आलो तर मला सुद्धा अटक केली जाईल. मुळात आमच्यावर जे काही आरोप करण्यात आले आहे. ते खोटे आणि निरर्थक आहे असा दावा भुजबळांनी केलाय. तसंच भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी जाणूनबुजून महाराष्ट्र सदनमध्ये गैरव्यवहार झाल्याचा दावा केला. त्यांनीच सुडापोटी चौकशीची मागणी केली. समीर आणि पंकज यांचा या व्यवहाराशी संबंध नाही. मुळात भुजबळ कुटुंबाला उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप भुजबळांनी केलाय.

मी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून मागसवर्गीयांसाठी काम करतोय. त्यामुळेच माझे शत्रू मला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. माझा बळी चढवला जात आहे. माझे सगळे सहकारी माझ्यासोबत आहे, यातून मी नक्की बाहेर पडेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Salil Kolhatkar

    when person start bring his cast religion for defending himself that we can make out he is in fault and not able to defend himself

close