‘त्या’ जुळ्या बहिणींच्या राहिल्या आता आठवणी

February 2, 2016 11:03 PM0 commentsViews:

गोविंद वाकडे, पुणे – 2 फेब्रुवारी : मुरुड इथल्या दुर्घटनेनंतर पुण्यातल्या 13 कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगरच कोसळलाय. या दुर्घटनेत कुणी आपल्या हाताशी आलेला मुलगा, तर कुणी मुलगी गमावली आहे. शिवाजीनगर परिसरात राहणार्‍या अन्सारी कुटुंबावर तर काळानं दुहेरी आघात केलाय. या दुर्घटनेत अंसारी कुटुंबाने आपल्या जुळ्या मुली गमावल्या आहेत.

rafiya_ansariपुण्यातल्या जूना तोफखाना परिसरात जमलेली ही गर्दी आहे. मुमताज  अन्सारी यांच्या राफिया आणि साफिया या जुळया मुलींच्या अंत्ययात्रेसाठी…मुरुड दुर्घटनेत सर्वात आधी ह्या दोन जुळया बहिणींना समुद्रानं गिळंकृत केलं. अंसारी कुटुंबावर तर काळानं घाला घातला आहेच…पण त्यांच्यासोबत दररोज कॉलेजमध्ये शिकणार्‍या मैत्रिणींना मात्र त्या आपल्यासोबत नाहीत, ही कल्पना मुळी सहन होत नाहीये.

कॉलेजच्या सहलीसाठी जेव्हा मुलं जातात, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणी घ्यायची ? अंसारी जुळ्या बहिणींचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, याची माहिती केवळ प्रसार माध्यमांमधूनच त्यांना ही दुदैर्वी माहिती मिळाली. पण कॉलेजनं त्यांना साधं कळवण्याची तसदीही घेतली नाही, असा त्यांनी आरोप केला आहे. पण कॉलेजच्या शिक्षकांनी त्यांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव केला होता. तरीही मुलं समुद्रात गेली. त्यामुळं या घटनेला मुलंच जबाबदार आहेत, असा दावा कॉलेजच्या विश्वस्तांनी केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close