12 डब्यांच्या लोकलसाठी हार्बर लाईनवर आजपासून विशेष ब्लॉक

February 3, 2016 9:48 AM0 commentsViews:

mumbai-trains

मुंबई – 03 फेब्रुवारी : मुंबईमध्ये हार्बर लाईननं प्रवास करणार्‍यांसाठी दिलाशाची बातमी आहे. हा भाग मोठ्या वर्दळीचा आहे. मात्र, या लाईनवर अजूनही 9 डब्यांच्या गाड्या चालवल्या जातात. या गाड्या 12 डब्यांच्या कराव्यात अशी गेल्या कित्येक वर्षांपासूनची इथल्या प्रवाशांची मागणी आहे. आता ही मागणी पूर्ण होण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल पडतंय. त्यासाठी सीएसटीवर एकूण 72 तासांचा जंबो ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक सलग नसणार आहे, तर आज रात्रीपासून 9 दिवसांसाठी 3 तास ब्लॉक घेण्यात येईल. सीएसटी स्टेशनजवळ हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल पूर्ण तर काही अंशत: रद्द होणार आहेत.

या गाड्या रद्द होणार

- सीएसटी-अंधेरी – पहाटे 4.27 वा
– सीएसटी-वांद्रे – पहाटे 4.52 वा.
– वांद्रे-सीएसटी – पहाटे 4.30 वा.
– अंधेरी-सीएसटी – पहाटे 5.17 वा.

या गाड्या अंशत: रद्द होणार

- पनवेल-सीएसटी (रात्री 11.47 वा. वडाळा ते सीएसटी यांदरम्यान खंडित)
– सीएसटी-पनवेल (पहाटे 4.23 वा. सीएसटी ते जुईनगर यांदरम्यान खंडित)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close