मतदारांचे वॉर्डच बदलले

March 5, 2010 10:39 AM0 commentsViews: 1

विनय म्हात्रे, नवी मुंबई5 फेब्रुवारीनवी मुंबई महापालिकेच्या एप्रिलमध्ये होणार्‍या निवडणुकीत बहुतांश नगरसेवकांचे नशीब टांगणीला लागले आहे. त्यांनी गेली पाच वर्षे या निवडणुकीसाठी आपल्या वॉर्डात तयारी केली. पण आता त्यांच्या वॉर्डातील मतदारांची नावे दुसर्‍याच वॉर्डात गेली आहेत. त्यामुळे बहुतांश नगरसेवकांसमोर पेच निर्माण झालाआहे.नवी मुंबईत एकूण 6 लाख 29 हजार मतदार आहेत. यापैकी 66 वॉर्डमधून 283 तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत.तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपली नावे ज्या मतदारयादीत होती, तिथून ती दुसर्‍या वॉर्डात कशी गेली असा प्रश्न मतदारांनाही पडला आहे.एकंदरीतच महापालिकेने आता या तक्रारींची दखल घेऊन सर्व्हे केला तरच या नगरसेवकांना संधी मिळेल. नाहीतर त्यांना या निवडणुकीला मुकावे लागण्याचीच शक्यता अधिक आहे.

close