रुपी बँक गैरव्यवहार प्रकरणी संचालक, अधिकारी दोषी

February 3, 2016 12:04 PM0 commentsViews:

Rupee bank

03 फेब्रुवारी : रुपी बँकेत झालेल्या गैरव्यवहारांच्या चौकशीचा अहवाल काल (मंगळवारी) राज्य शासनाला सादर करण्यात आला. या अहवालानुसार रुपी बँकेच्या तत्कालीन 15 संचालकांना आणि बँकेतील 54 अधिकारी आणि कर्मचार्‍यांना या प्रकरणात दोषी धरण्यात आले असून गैरव्यवहारातील त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या सर्वांकडून 1,490 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच बँकेच्या आर्थिक नुकसानी प्रकरणी वसुलीची पुढील कार्यवाही सहकार आयुक्त करतील, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

रुपी बँकेत हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले असून लाखो खातेदारांचेही कोटय़वधी रुपये बँकेत अडकले आहेत. बँकेवर प्रशासक आल्यानंतर गेली दोन-तीन वर्षे बँकेच्या विलीनीकरणाबाबतही सातत्याने चर्चा सुरू होती. त्यासाठी काही बँकाही पुढे आल्या होत्या. मात्र वेगवेगळ्या अडचणींमुळे विलीनीकरण होऊ शकले नाही. ठेवीदारांचे पैसे अडकल्यानं गेल्या काही महिन्यात अनेक निदर्शनं झाली. त्यामुळे आता1490 कोटींची वसुली होऊन, ठेवीदारांना आपले पैसे कधी मिळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close