राज्य सरकारला दिलासा, गिरगाव चौपाटीवर ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला परवानगी

February 3, 2016 1:08 PM0 commentsViews:

SUPREME COURT

मुंबई – 03 फेब्रुवारी : मुंबईत ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम घेण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारली होती. त्यावर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. हाय कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने सरकारसमोरचा अडथळा दूर झाला आहे.

देशात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाकांक्षी संकल्पना ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ‘मेक इन इंडिया वीक’ हा कार्यक्रम गिरगाव चौपाटी इथल्या आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधानांसह 3 देशांचे पंतप्रधान तसंच देशोदेशीची बडी मंडळी हजेरी लावणार आहेत. गिरगाव चौपाटीवरील 2 लाख चौरस फूट जागेवर येत्या 14 फेब्रुवारीला हा कार्यक्रम साजरा होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close