पंतप्रधानांच्या ताफ्यावर हल्ला, मोदींच्या कारवर महिलेनं फेकली कुंडी

February 3, 2016 4:21 PM0 commentsViews:

pm_modi_car_attack2नवी दिल्ली – 03 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय. मोदींच्या कारवर एका महिलेनं कुंडी फेकण्याचा प्रयत्न केलाय.

पंतप्रधान मोदी साऊथ ब्लॉकवरच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना या महिलेनं पंतप्रधानांच्या ताफ्यावर हल्ला केला. आणि कुंडी मोदींच्या कारवर भिरकावली. मोदींच्या सुरक्षारक्षकांनी या महिलेला ताब्यात घेतलं. या महिलेनं का हल्ला केला हे अद्याप कळू शकलं नाहीय. संसदमार्ग पोलीस ठाण्यात या महिलेची चौकशी होत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close