बंगालने उघडलं विजयाचं खातं, तेलगू टायटन्सला धोबीपछाड

February 3, 2016 7:29 PM0 commentsViews:

pro_kabaddi_bangal03 फेब्रुवारी : प्रो कबड्डी लीगमध्ये बंगालच्या टीमने तेलगू टायटन्सवर 25-17 असा विजय मिळवत आपलं खात उघडलं. बंगालच्या या विजयात सिंहाचा वाटा होता तो महाराष्ट्राच्या खेळाडूंचा. निलेश शिंदे, महेश राजपूत, नितीन मोरे हे बंगालच्या विजयाचे हिरो ठरले.

पहिल्या दोन सिनझमध्ये निराशाजनक कामगिरी करणार्‍या, बंगालचा संघानं या सिझनमध्ये जबरदस्त सुरुवात केली. आणि तेलगू टायटन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केलं. तेलगू टायटन्सचा हिरो असलेल्या राहुल चौधरी बंगाल विरुद्ध अपयशी ठरला. घरच्या मैदानानर तेलगू टायटन्सचा हा दुसरा पराभव होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close