महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्याची शक्यता

March 5, 2010 11:28 AM0 commentsViews: 8

5 फेब्रुवारीया महिला दिनाला यूपीए सरकारने भारतीय महिलांना एक खास भेट देण्याचे ठरवले आहे. अखेर महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विधेयकामुळे लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे.हे विधेयक मंजूर होण्यासाठी सरकारला चांगल्या संख्याबळाचा पाठिंबा आहे. भाजप आणि डाव्या पक्षांनी याला याआधीच पाठिंबा दिला आहे. पण राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षांचा मात्र याला विरोध आहे. या आरक्षणामध्ये मागासवर्गीय महिलांसाठी वेगळे आरक्षण असावे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचा विरोध मावळावा यासाठी सरकार या पक्षांशी वाटाघाटी करत आहे.अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काल यांसदर्भात लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्व महिला खासदारांशीही चर्चा केली आहे.

close